Header Ads

Ngo-Banner-web

Breaking News

राष्ट्रीय स्वतंत्र संपादक पत्रकार संघाची बैठक संपन्न शासनाकडे पत्रकारांसाठी विविध मांगण्याचा ठराव - नामदेव शेलार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवनई दिल्ली

पत्रकार सामाजिक संकल्पनेतुन केंन्द्र शासन मान्यता स्वतंत्र संपादक संघ रजि एनजीओ संपुर्ण भारत देशात काम करणार्या संघटनेची ऑनलाईन बैठक मिटींग शनिवारी संपन्न झाली त्यामध्ये विविध विषयावर चर्चा करून पत्रकारांसाठी शासनाकडुन अपेक्षित असलेल्या मांगण्याचा ठराव संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले.यावेळी दिली हरयाणा पंजाब उत्तरप्रदेश मध्यप्रदेश गुजरात महाराष्ट्रासह अन्य राज्यातील पत्रकार पदाधिकारी राज्य प्रमुख तसेच महाराष्ट्रातील राज्य जिल्हा तालुका शहर पदाधिकारी सामील झाले होते.सांगली जिल्हाध्यक्ष विजय हुपरीकर यांनी मिटींगचे प्रास्ताविक केले तर संघटनेचे राष्ट्रीय संपर्क प्रमुख अफसर शेख यांनी आभार मानले.हेमंत केळकर,दामोदर लोखंडे,रविंद्र लक्षेटटी,संतोष वेंदे,सचिन सावंत ,उमेश साठे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय हुबाले अन्य पदाधिकारी सदस्य यांनी विविध मुद्दे मांडले महाराष्ट्राचप प्रदेश अध्यक्ष वसंत भगत,उपाध्यक्ष मिलिंद दळवी,निलेश अनभवणे,राष्ट्रीय सरचिटणीस भरत भोईर,राष्ट्रीय संपर्क प्रमुख अफसर शेख यांनी संघनेच्या ठरावाना मान्यता दिली तर दिल्ली,पंजाब,हरयाणा, मध्यप्रदेश,उत्तरप्रदेश,गुजराथ,कर्नाटक अन्य राज्यात आपल्या संघटनेच्या पत्रकारांना शासनाच्या सर्व योजनाचा लाभ मिळतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील पत्रकारांना शासनाच्या योजनाचा लाभ मिळावा म्हणुन दिल्ली दरबारी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले दिल्लीचे अध्यक्ष प्रिन्सकुमार चौहान,पंजाबचे अध्यक्ष अमर मेहरा,मध्येप्रदेशचे अध्यक्ष विवेक कुमार या राज्याचे अध्यक्ष संघटनेला देशात बळ देणार असल्याचे सांगितले.केंन्द्र आणि राज्य सरकारकडे पत्रकारांना सुविधा मिळाव्यात पत्रकाराच्या मुलांना शिक्षणात मदत मिळावी आरोग्याचा विमा मिळावा घरे पत्रकार भुवन संरक्षण कायदयाचं संरक्षण मिळावं शासकीय निमशासकीय कमेटयांवर पत्रकारांना घेण्यात यावं शासनाच्या योजनाचा लाभ मिळावा टोलमाफी मिळावी अधिस्विकृती सर्व पत्रकाराना मिळावी मासिक मानधन दहा हजार मिळावे पत्रकारांची जिल्हा माहिती कार्यालयात नोदणी व्हावी संघटनेचे पत्रकारांना शासकीय अधिस्विकृती कमेटी, शासकीय कमेटीवर घ्यावे मंत्रालयात स्वतंत्र पत्रकार कक्ष दयावे वार्षिक फंड मिळावा पत्रकाराना मागेल तेव्हा मोफत पोलिस संरक्षण दयावे पत्रकारावरील खोटे गुन्हे नोदवण्यास आळा घालावा पत्रकारावरील हल्ले थांबवावे वृत्तपत्राना स्थानिक तसेच राज्य केंन्द्र स्तरावरील सर्व जाहिरातीचा लाभ दयावा शासकीय निमशासकीय टेंडर नोटीस जाहिराती प्रत्येक जिल्हा माहिती जनसंपर्क अधिकारी यांच्या मार्फत वृत्तपत्राना स्थानिक पातळीवर देण्यात यावेत राज्य केंन्द्र पातळीवर त्यांची आमलबजावणी व्हावी प्रत्येक जिल्हयाचे पालकमंत्री यांनी पत्रकाराच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीत आमच्या संघटनेचे पदाधिकारी यांना प्राधान्य दयावे पत्रकाराना बोगस ठरवून जनमाणसात प्रशासनात प्रत्यक्ष काम करणार्या पत्रकाराना त्यांच्या हक्क योजना पासुन दुर ठेवले जाते यासाठी शासनाने आपल्या नियम अटी जीआर प्रमाणे बोगस पत्रकार शोधुन त्यांच्यावर कारवाई करावी छोटया वृत्तपत्र नोंदणीकृत चॅनेल यांची मुस्काटदाबी थाबवावी प्रत्येक जिल्हा तालुका पातळीवर जिल्हा जनसंपर्क कार्यालयाच्या अधिकार्याचा मासिक संवाद व्हावा मिटिंग घ्यावी सतत 10 वर्षे पत्रकारिता केलेल्या पत्रकाराना शासनाने मानधान सुरू करावं पत्रकाराना स्थानिक पातळीवर प्रेस नोट देण्यात यावी शासकीय निमशासकीय कार्यक्रमाना निमंत्रीत करण्यात यावे शासनाने संघटनेशी समन्वय साधुन पत्रकारांची शासकीय उपक्रमाना मदत मिळेल अशी भुमिका बजावावी शासकीय भुखंड पत्रकार संघटनेला त्यांच्या प्रकल्पासाठी उपलब्ध करून दयावीत अशा विविध मांगण्या केंन्द्र राज्य सरकारकडे करण्यात आल्या असुन राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी सर्व संघटनेच्या पदाधिकार्याना मौलाचे मार्गदर्शन करून शासन आणि प्रशासन यांच्याशी पत्रकाराचे समन्वय राहावे असे आहवान केले यावेळी सर्व पदाधिकारी सदस्य बैठकीत सामील झाले होते ज्यांना संपर्क करता आला नाही त्यांनी व्हॉटसाप फोनव्दारे आपले मनोगत समस्या मांडल्या येत्या पुढील महिण्यात राष्ट्रीय अधिवेशन मुरबाड ठाणे जिल्हा येथे मुख्यकार्यालय स्थळी होणार असुन त्यासंबधी रूपरेषा आखली आहे.

No comments