Header Ads

Ngo-Banner-web

Breaking News

स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांना मानधनासह इतर सुविधा मिळाव्यात म्हणून राष्ट्रपती,पंतप्रधान,राज्यपाल,मुख्यमंत्री यांना निवेदन

 


राष्ट्रीय कार्यक्षेत्र  असलेल्या नोंदणीकूत स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या वतीने देशातील विविध  दैनिक ,साप्ताहिक पाक्षिक ,मासिक ,टीव्ही चॅनल ,नोंदणीकृत केंद्रीय वृत्तपत्रांमध्ये पत्रकार म्हणून काम करीत असलेल्या सर्व पत्रकारांची मुले विविध क्षेत्रात शिक्षण घेत असून शालेय शिक्षण संस्था ,कॉलेज ,विद्यापीठ यांनी वार्षिक फी भरण्यास सांगितले आहे व सक्तीने वसुली चालू केली आहे तसेच पत्रकारांचे कुटुंब कोरोना आजाराने वअन्य आजाराने ग्रासलेले असून त्यांना आरोग्य ,शिक्षण ,कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी शासकीय अनुदान व मदतीची अत्यंत गरज आहे तरी शासनाने आपल्या शासकीय स्तरावरून किंवा एनजीओच्या माध्यमातून राजकीय पक्ष त्यांच्या निधीतून मदतीचा हात द्यावा तसेच शासनाच्या सर्व योजनांचा लाभ पत्रकारांना मिळावा प्रत्येक पत्रकाराला मासिक रुपये रु10,000रु. दहा हजार। एवढे अनुदान किंवा मानधन म्हणून मिळावे तसेच ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांना घरकुल योजना मिळावी पत्रकारांसाठी असलेला निधी पत्रकारांना वितरित करावा सर्व खाजगी सरकारी दवाखान्यात पत्रकारांसह पत्रकारांच्या कुटूंबियांना मोफत सर्व प्रकारचे उपचार मोफत मिळावेत व तांत्रिक तपासणी मोफत व्हावी व संघटनेच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट निधी पत्रकारांसाठी उपलब्ध करून द्यावा अशा स्वरूपाची मागणी स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या वतीने निवेदनाद्वारे देशाचे माननीय राष्ट्रपती ,माननीय पंतप्रधान, माननीय राज्यपाल ,माहिती व तंत्रज्ञान दूरसंचार मंत्री भारत सरकार ,मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ,उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ,यांचेकडे पाठवले असून निवेदनावर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव पांडुरंग शेलार यांच्यासह्या आहेत तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष गौरव शेलार , राष्ट्रीय संपर्कप्रमुख अफसर शेख, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वसंत भगत ,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद दळवी, यांच्या संमतीने निवेदन पाठविले असल्याची माहिती स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी दिली आहे.

 

No comments