स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या राष्ट्रीय संपर्क प्रमुख पदी अफसर शेख, जिल्हाध्यक्षपदी लोकेश बर्वे व संघटक पदी उमेश साठे यांची निवड
राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या "SSPA स्वतंत्र संपादक पत्रकार (असोसिएशन) संघाच्या राष्ट्रीय संपर्कप्रमुख पदी मानव विकास परिषदेचे अध्यक्ष अफसर भाई शेख यांची व अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी लोकेश बर्वे व जिल्हा संघटक पदी उमेश साठे यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष श्री नामदेव शेलार यांनी केली.
स्वतंत्र संपादक पत्रकार संघ राष्ट्रीय स्तरावरील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संस्था असून महाराष्ट्रबरोबर राजस्थान दिल्ली बिहार या ठिकाणी संघटना मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. याबाबत माहिती देताना संघटनेचे संपर्कप्रमुख अफसर शेख यांनी सांगितले की.आजवर संघटनेने पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यावर शासन दरबारी नेहमीच पाठपुरावा करून पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी कायदा निर्गमित करावा यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. पत्रकारांना संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यात मोफत टोल मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे. ज्येष्ठ पत्रकारांना शासनातर्फे पेन्शन योजना लागू व्हावी पत्रकारांना विमा संरक्षण मिळावे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पत्रकारांसाठी अत्यल्प खर्चात हॉस्पिटलची सुविधा मिळावी व पत्रकारांचे मुलांना सवलतीमध्ये शिक्षण मिळावे यासाठी संघटना प्रयत्नशील राहील. यापुढील काळात शहरासह जिल्ह्यात संघटनेचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात येणार असून प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार बांधवांना संघटनेचे सभासद बनवून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आवाज बुलंद करण्यास संघटना बांधील राहील अशी माहिती नवनियुक्त जिल्हाध्यक्ष श्री लोकेश बर्वे यांनी दिली.या निवडीबद्दल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री नामदेव शेलार, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री.गौरव शेलार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री.वसंत भगत, प्रदेश उपाध्यक्ष श्री मिलिंद दळवी यांच्यासह समाजातील मान्यवर व पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले.
No comments