स्वतंत्र संपादक पत्रकारांची सामाजिक सांस्कृतिक संघटना....!
स्वतंत्र संपादक पत्रकार संघ हि एक निर्भिड निपक्ष झुंझार संपादक पत्रकारांची सामाजिक सांस्कृतिक संघटना आहे. पत्रकार, संपादक, वृत्पपत्राचे मालक, छायाचित्रकार यांची एकत्रित अशी हि संघटना आहे. जी आपसात विचारांची देवाण-घेवाण मनमोकळेपणाने करताना सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात जोमानं कार्य करीत आली आहे. संपुर्ण भारत देशातील पत्रकारांमधून चांगले विशेष काम करणाऱ्या पत्रकार संपादकांचा पुरस्कार देऊन सन्मान करणे, कलावंतांचा पुरस्कार देवून सत्कार करून गौरव करणे याकडे पत्रकार संघाने विशेष लक्ष देण्याचा मानस ठेवला आहे.
चांगले, लोकप्रिय लोकप्रतिनिधी, कर्तुत्ववान शासकीय, निमशासकीय अधिकारी यांचीही दखल घेत त्यांचाही गौरव पत्रकार संघ करीत आला आहे. जात-पात,यांचा कोणताही भेद मानता न बाळगता.भारत माझा देश आहे हा समभाव ठेवण्याचा काम हा संघ करत आहे व करत राहील.नोंदणीकृत वृत्तपत्र व चॅनेलच्या पत्रकारांना टोल मोफत प्रवेश,सर्व नोंदणीकृत वृत्तपत्रे चॅनेल यांना शासकीय निमशासकीय जाहिराती मिळणे,पत्रकारांसाठी आरोग्य विमा, अपघातग्रस्त पत्रकारांना मदत, पत्रकारांच्या निवासासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न, पत्रकार संपादक व त्यांचे कुटूंबियांसाठी सवलतीमध्ये हॉस्पिटल सुविधा पत्रकारांच्या मुलांसाठी सवलतीमध्ये शालेय शिक्षण असे अनेक उपक्रम पत्रकार संघात राबविण्यात येणार आहेत
No comments